आज बुधवार १५ मे २०२४ रोजी, कर्क राशीनंतर चंद्र सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी वृद्धी योग, लक्ष्मी नारायण योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दुर्गाष्टमीच्या दिवशी या ५ राशीच्या लोकांना दिवस फायदेशीर ठरणार आहे.
मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश येईल. मुलांविषयी मनात असलेली चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ होईल. स्वतःला शारीरिक आणि बौद्धिक कुवतीनुसार काम स्वीकाराल. तुमच्या मितभाषी स्वभावाचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. व्यापारीवर्गास व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. नातेवाईक मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कुटुंबामधून आपणास शुभ वार्ता मिळणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभागी झाल्याने समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मन प्रसन्न राहील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकरिता आनंदी दिवस आहे. नवनवीन कल्पना सुचतील.आणि त्या अंमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवा भागीदार जोडण्याचा विचार कराल. जास्त भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मनात शंका ठेवू नये.तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल.आरोग्य उत्तम राहील. वृद्धी योगात आज घरात मंगलकार्य घडतील.
सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत वरिष्ठांना प्रभावित कराल. विचारात असलेल्या नवीन कल्पना स्पष्टपणे सर्वांसमोर व्यक्त करा. तुम्हाला कामात सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग जुळून येत आहेत. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. कर्मस्थ मंगळामुळे पोलिस सैन्यातील व्यक्तींना पदप्राप्ती होऊन मानसन्मान वाढीस लागेल. शनि आणि चंद्राच्या युतीमध्ये तुम्हाला आज आर्थिक फायदा होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मात्र अहंकारी वृत्तीचा त्याग करा. कामाच्या बाबतीत ध्येय निश्चित करा. महत्वाच्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न आज सुटतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज घरामध्ये वाहनासारखी मोठी खरेदी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक दिवस आहेत. नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढ होईल. एखाद्या गोष्टीत ठाम निर्णय घेऊ शकाल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. घरामध्ये एकमेकांच्या विचारांमध्ये तफावत जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल.विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी आज अनुकूल दिवस आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज कौटुंबिक सौख्य लाभेल. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांचे विवाह जुळतील. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण निर्माण होईल. महत्वाच्या कामात भावंडाची योग्य साथ मिळेल. तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळेल. युवकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.आर्थिकबाबींमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. अनेक दिवसांपासून टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्यादृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. व्यापारात अधिक कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम हाती घ्याल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. एखाद्या विषयात ठाम निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुनी देणी वसूल होतील.