Today Lucky Zodiac signs : 'या' पाच राशींसाठी आजचा दिवस अनुकूल, तुमचीही रास यात आहे का?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiac signs : 'या' पाच राशींसाठी आजचा दिवस अनुकूल, तुमचीही रास यात आहे का?

Today Lucky Zodiac signs : 'या' पाच राशींसाठी आजचा दिवस अनुकूल, तुमचीही रास यात आहे का?

HT Marathi Desk HT Marathi
Mar 15, 2024 02:58 PM IST

Lucky Zodiac signs today 15 march 2024 : चंद्र मंगळ योगाचा आजचा दिवस पाच राशींसाठी भाग्योदयाचा आहे. कोणत्या आहेत या राशी?

'या' पाच राशींसाठी आजचा दिवस अनुकूल, तुमचीही रास यात आहे का?
'या' पाच राशींसाठी आजचा दिवस अनुकूल, तुमचीही रास यात आहे का?

 

मेष

चंद्रबळ पाठिशी आहे. नवीन कामकाज सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेता येतील. नोकरीच्या ठिकाणी कष्ट कराल. नोकरी-व्यवसायात आर्थिक वृद्धीचा योग आहे. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. वाहन खरेदीचा योग आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजवाल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थांना नव्या क्षेत्रात यशाची संधी आहे. पत्नीची साथ लाभेल. राजकारणी व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. शुभ रंगः तांबूस शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०४, ०९.

कर्क

चंद्रबळ उत्तम असल्यामुळं आज शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात आर्थिक समृद्धी आणणारा दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. आकस्मिक लाभाचा दिवस आहे. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रमोशनची संधी आहे. राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला दिवस आहे. सरकारी योजना मार्गी लागतील. जुनी येणी वसूल येतील. कर्ज मंजूर होईल. शुभ रंग: पांढरा शुभ दिशा: वायव्य. शुभ अंकः ०४, ०७.

मिथुन

मंगळ-चंद्र योग आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक सुख लाभेल. वडीलधाऱ्यांचे निर्णय फायदेशीर ठरतील. मानमरातब वाढवणारा दिवस आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. आज यशाचा योग आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. तुमच्या नव्या कल्पनांना पाठिंबा मिळेल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. व्यापारी वर्गासाठी आकस्मिक धनलाभ योग आहे. परदेश वारीचा योग आहे. पोलीस व सैन्यातील व्यक्तींसाठी मानसन्मानाचा दिवस असेल. शुभ रंग: पोपटी शुभ दिशा: उत्तर. शुभ अंकः ०१, ०४.

सिंह

चंद्रमंगळ योगामुळं दिनमान उत्तम राहील. वडीलधाऱ्यांकडून आर्थिक लाभ होतील. नोकरदारांसाठी दिवस उत्तम आहे. प्रमोशन मिळू शकते. ऐषारामी वस्तूंची खरेदी कराल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या नव्या कल्पना उचलून धरल्या जातील. मित्रमंडळी, नातेवाईकांकडून मदतीचा हात पुढं येईल. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. कौटुंबिक सुखाचा अनुभव घ्याल. सरकारी योजनेचा लाभ होईल. एकूण दिवस चांगला जाईल. शुभ रंग: लालसर शुभ दिशा: पूर्व. शुभ अंकः ०५, ०८.

कन्या

कन्या राशीचा स्वामी मंगळ उत्तम स्थितीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. आर्थिक निर्णय सक्षमपणे घ्याल. सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमची वाणी आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबातून चांगली वार्ता कानी पडेल. व्यापाऱ्याना अनपेक्षित फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०१, ०९.

Whats_app_banner