मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कामात यश येईल, वाहन घर खरेदी करता खास योग! 'या' ५ राशींना आजचा दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : कामात यश येईल, वाहन घर खरेदी करता खास योग! 'या' ५ राशींना आजचा दिवस ठरेल लकी

Jun 15, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 15 June 2024 : ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलातून आज रवियोग, वरियान योग, शुक्रादित्य योग निर्मिती होत आहेत. अशात आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी भाग्यदायक ठरणार आहे जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १५ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १५ जून २०२४

आज शनिवार १५ जून २०२४ रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नववी तिथी असून या दिवशी रवियोग, वरियान योग, शुक्रादित्य योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार तयार होत असलेला शुभ योग कोण-कोणत्या राशींना लाभदायक ठरेल. जाणून घ्या आजच्या लकी राशी.

कर्क: 

आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. पैशाची अडकलेली कामेही पार पडतील. भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थी शैक्षणीक प्रगती करतील. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.

कन्या: 

आज ग्रह नक्षत्राच्या शुभ योग संयोगात गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सहकार्य चांगले मिळेल. तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 

तूळ: 

आज शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. काम करण्यास उत्साह येईल. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

धनु: 

आज अनुकुल फळ प्राप्त होईल. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे.  

मकरः 

आज इच्छित फळ मिळणार आहे. नवीन योजना यशस्वी होतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल. 

WhatsApp channel