Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील, मोठे पद मिळेल! या ५ राशींसाठी लकी सोमवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील, मोठे पद मिळेल! या ५ राशींसाठी लकी सोमवार

Lucky Zodiac Signs : नोकरीतील बदल लाभदायक ठरतील, मोठे पद मिळेल! या ५ राशींसाठी लकी सोमवार

Published Jul 15, 2024 04:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 15 July 2024 : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असल्याने या दिवशी लक्ष्मी नारायण योगासोबत सिद्ध योग, रवियोग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आजचा दिवस या ५ राशींसाठी लकी राहील.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी १५ जुलै २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी १५ जुलै २०२४

आज १५ जुलै २०२४ सोमवार रोजी, चंद्राचे शुक्र ग्रहाच्या तूळ राशीत भ्रमण होणार आहे आणि कर्क राशीत बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योगाचा शुभ संयोगही तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असल्याने या दिवशी लक्ष्मी नारायण योगासोबत सिद्ध योग, रवियोग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे.अशात या ५ राशींसाठी दिवस लकी राहील.

वृषभ: 

आज व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील.

मिथुन: 

आज कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मन समाधानी होईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. 

कर्कः 

आज यश व फायदा मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. व्यापार उद्योगात प्रगती राहील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. 

सिंहः 

आज मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे.

वृश्चिकः 

आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

Whats_app_banner