चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत जाणार असून, सूर्य कर्क राशीत आणि बुध सिंह राशीत असल्यामुळे सूर्य आणि बुध यांचा द्वैद्वादश योग तयार झाला आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी रवियोग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने लाभ होणार आहे.
आज तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. प्रसिद्धी मिळवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. दुरवरचे प्रवास लाभदायक होईल, भौतिक सुख उत्तम मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील.
आज आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. कामे यशस्वी होईल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहील.
आज उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधी मिळणार आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदे होतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
आज लाभदायक दिवस आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.
आज तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.