मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : चार राशींसाठी आजचा दिवस मानसिक समाधानाचा व आर्थिकदृष्ट्या फायद्याचा

Lucky zodiac signs today : चार राशींसाठी आजचा दिवस मानसिक समाधानाचा व आर्थिकदृष्ट्या फायद्याचा

HT Marathi Desk HT Marathi
Sep 14, 2023 10:40 AM IST

Lucky zodiac signs today 14 september 2023 : गुरूपूजन आणि पिठोरी आमावस्येचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी, कसा आहे लाभदायी? वाचा…

Lucky Zodiac signs today
Lucky Zodiac signs today

कर्क: या राशीसाठी दिनमान अत्यंत शुभ आहे. उत्साहानं केलेल्या कामात यश निश्चित आहे. नोकरीतील नव्या योजनांवर काम सुरू कराल. कामाचा उरक पाहून नवी जबाबदारी मिळेल. बढतीचा योग आहे. नव्या कल्पना सुचतील. उद्योग- व्यवसायात आज लाभाचा दिवस आहे. मुलाखतीत यश मिळेल. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. प्रवासातून लाभ घडतील. शुभ रंग: पांढरा शुभ दिशा: पश्चिम.

ट्रेंडिंग न्यूज

मेष: कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानाचं राहील. दिनमान उत्साहवर्धक आहे. आर्थिकदृष्ट्या लाभाचा योग आहे. वेगवेगळ्या मार्गानं लक्ष्मी तुमच्यापर्यंत येईल. नव्या व्यवसायिक घटना घडतील. मित्र-मैत्रिणी भेटतील. नवीन वास्तू खरेदीचा विचार पुढं येईल आणि त्यावर निर्णय होईल. मुलाबाळांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. आज केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. प्रवासाचे योग आहे. शुभ रंग: केसरी शुभ दिशाः दक्षिण.

सिंह: आनंद, प्रसन्नता, आत्मसुख, मानसिक शांती आणखी काय हवं? हे सगळं आज सिंह राशींच्या व्यक्तीना लाभणार आहे. कुटुंबावर खर्च होईल, पण त्यातून एक वेगळं मानसिक समाधान लाभेल. लिखाणाच्या क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान मिळेल. नोकरी व्यवसायात नव्या कल्पनांवर काम करण्याचा विचार मनात येईल. सरकारी पातळीवर रखडलेली कामे तडीस जातील. प्रयत्न केल्यास फळ निश्चित आहे. धाडसानं घेतलेले निर्णय अचूक ठरतील. त्या प्रयत्नांना यश लाभेल. भावा-बहिणींकडून, नातलगांकडून सहकार्य लाभेल. नवीन प्रस्ताव लाभदायी ठरतील. शुभ रंग: लाल शुभ दिशा: पूर्व.

वृषभ: आजचा दिवस उत्साहात जाईल. घरात जवळच्या नातेवाईकांचं आगमन होईल. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. त्यातून समाधान होईल. आजचा दिवस आत्मविश्वासानं भरलेला असेल. नोकरी व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या येतील. त्यातून मानसन्मानही वाढेल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदाराची साथ मिळेल. सरकारी कामात यश येईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. समोरच्या व्यक्तींवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. नवी नाती जोडली जातील. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. शुभ रंगः गुलाबी शुभ दिशा: पश्चिम.

WhatsApp channel