आज सोमवार १४ ऑक्टोबर रोजी, चंद्र शनिदेवाच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करणार आहे, तर चंद्रापासून दहाव्या स्थानी शुभ ग्रह म्हणजेच शुक्र असल्यामुळे अमला योग तयार होत आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी अमला योगासह वृद्धी योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
आज प्रसिद्धीचे योग येतील. यश मिळेल. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. घरात एखादे धार्मिक कार्य कराल.
आज फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग आहेत.
आज कामाचा वेग वाढेल. कामाचा दर्जा सुधारेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आर्थिकदृष्या लाभ होईल. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे.
आज हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल.
आज दिवस लाभदायक ठरणार आहे. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.