आज मंगळवार १४ मे २०२४ रोजी, चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत जात आहे. तसेच, ही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे आणि या तिथीला गंगा सप्तमी तिथी व्रत पाळले जाते. गंगा सप्तमी व्रताच्या दिवशी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गंगा सप्तमीच्या दिवशी मेषसह ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आकस्मिक धनलाभाचा योग जुळून येत आहे. व्यापारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल.आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व मुलांसोबत संबंध चांगले राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.चंद्र अनुकूल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम कराल. व्यवसायात भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आध्यात्मिक रुची वाढून धार्मिक कार्ये घडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल.मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मानसन्मान पदवी अथवा पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मित्रमैत्रिणीमधील वादविवाद संपुष्टात येतील. जवळच्या व्यक्तींचा मनोरंजन करण्याकडे कल राहील. तसेच आज प्लुटो-चंद्र संयोगात मनाला समाधान लाभेल अश्या गोष्टी घडतील. भावंडांकडून सहकार्य लाभेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्यातील सुप्त गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची चांगली दाद मिळेल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्यादृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडून समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आज वृद्धी या शुभ योगात अनुकुल स्थिती राहणार आहे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही.
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.आज प्लुटो-चंद्र योगात प्रयत्न यशस्वी ठरतील.कोणावर विसंबून राहिलात तर मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. अचानक पैसे मिळाल्याने आनंदी राहाल.घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मोठी खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. आज चंद्र प्लुटोचा संयोगात कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही.
संबंधित बातम्या