आज गुरुवार १४ मार्च रोजी, चंद्र मेष नंतर शुक्रच्या वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी असून या दिवशी रवियोग, त्रिग्रही योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे.ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ होईल, या नशीबवान राशी कोणत्या आहेत? वाचा.
आज मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल. घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून नोकरी व्यवसायात लाभ होईल. प्रेरणा मिळेल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. दिवस भरभराटीचा आहे. क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंना भाग्याची उत्तम साथ लाभेल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
आज कामात यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग नफेत राहतील. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. संयमामुळे आर्थिक फायदा होईल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रवासातुन लाभ मिळवाल. यश मिळेल.
आज पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यश मिळवाल. आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते.
आज फायदा होईल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल.
आज नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पन वाढेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिवस उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्या कल्पना आमलात आणा. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.
संबंधित बातम्या