मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कुणाला बक्कळ पैसा तर कुणाला चांगली नोकरी! या ५ राशी आज ठरणार लकी

Lucky Zodiac Signs : कुणाला बक्कळ पैसा तर कुणाला चांगली नोकरी! या ५ राशी आज ठरणार लकी

HT Marathi Desk HT Marathi
Jun 14, 2024 10:27 AM IST

Lucky Rashi Bhavishya 14 June 2024 : सिद्धी योगात आणि विष्टी करणात आज कोणत्या ५ राशी लकी ठरणार आहेत त्याबाबत जाणून घेऊया.

Lucky Zodiac Signs : कुणाला बक्कळ पैसा तर कुणाला चांगली नोकरी! या ५ राशी आज ठरणार लकी
Lucky Zodiac Signs : कुणाला बक्कळ पैसा तर कुणाला चांगली नोकरी! या ५ राशी आज ठरणार लकी

सकाळी उठल्याबरोबर वृत्तपत्र किंवा सोशल मीडियावर दैनंदिन राशीभविष्य पाहणे अनेकांची जीवनशैली असते. बहुतांश लोक राशीभविष्य पाहूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात. आजचा दिवस कसा जाणार? आयुष्यात कोणत्या घडामोडी घडणार? फायदा होणार की नुकसान? अशा अनेक बाबी यामधून माहिती होतात. तसेच या माध्यमातून आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर उपाय करणे शक्य होते. ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव या राशींवर पडत असतो. यामध्ये काही राशी अतिशय भाग्यवान ठरतात. ग्रहांच्या शुभ प्रभावाने या राशी फायद्यात असतात. पाहूया आज शुक्रवारच्या दिवशी कोणत्या ५ राशी नशीबवान ठरणार आहेत.

वृषभ

वृषभ राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस सुखद असणार आहे. आज शुक्र संक्रमणाने या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. घरामध्ये शुभ कार्य करण्याची योजना आखली जाईल. घरातील वातावरण अगदी आनंददायक राहील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे मन उत्साही राहील. अनेक दिवसांपासून नोकरी बदलाचा विचार करत असाल तर आज ती इच्छा पूर्ण होऊ शकते. सायंकाळी मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात उत्तम मनोरंजन होईल. कलाक्षेत्रातील लोकांना आज चांगले व्यासपीठ मिळेल.

मिथुन

आज मिथुन राशीत बुध गोचर करणार आहे. मात्र त्याठिकाणी आधीच शुक्र विराजमान आहे. अशात दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. या योगाचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात महागड्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरी-व्यापारात सहकारी आणि भागीदारांचे सहकार्य लाभेल. मात्र आज तुम्हाला कोणत्याही गोष्टीत आळस करुन चालणार नाही. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

कन्या

आज सिद्धी योगात कन्या राशीला भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. तुमच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. त्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. आज तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होईल. तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन इतरांसाठी मोलाचे ठरेल. शैक्षणिक किंवा लिखाण क्षेत्रातील लोकांना आज चांगली धनप्राप्ती होईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल.

वृश्चिक

आज गजकेसरी योगात वृश्चिक राशीसाठी लाभदायक दिवस असणार आहे. आज महत्वाच्या कामात कुटुंबातील सदस्यांची पूर्ण साथ मिळणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मार्गी लागतील. मनावरचा ताण कमी होऊन मनःशांती लाभेल. व्यवसायिकांना आज एखादा मोठा प्रकल्प हाती लागेल. भविष्यात त्याचा मोठा फायदा दिसून येईल. आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना आईचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेणे विसरु नका. छोट्या गुंतवणुकीतून मोठा फायदा दिसून येईल.

मकर

विष्टी करणात आज मकर राशीवर ग्रह-नक्षत्रांचा शुभ प्रभाव असणार आहे. आर्थिक प्रगतीचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा उंचावेल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचे ग्रह-नक्षत्र आज मजबूत असल्याने तुमच्या विरोधातील विरोधकांचे प्रयत्न अपयशी ठरतील. त्यामुळे आत्मविश्वास दुपट्टीने वाढेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली नवी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबासोबत मनमोकळा संवाद होऊन नातेसंबंध आणखी दृढ होतील. सामाजिक कार्यात आवर्जून सहभाग घ्याल. यातून मानसन्मान वाढीस लागेल.

WhatsApp channel
विभाग