आज १४ जुलै २०२४ रविवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून, या दिवशी रवियोग, शिवयोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल.
आज ग्रहांचा योग पाहता दिवस अनुकूल आहे. फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. खरेदीचे योग येतील.
आज यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील.
आज प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. प्रगती उल्लेखनीय असेल.
आज कामाचा दर्जा सुधारून टाकेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. विवाह इच्छूकांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल.. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत.
आज चित्रा नक्षत्रातील चंद्रभ्रमण विशेष लाभ दायक ठरणार आहे. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल.
संबंधित बातम्या