मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: विनायक चतुर्थी व भोगीचा संयोग, या ५ राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील

Today lucky zodiac signs: विनायक चतुर्थी व भोगीचा संयोग, या ५ राशींची रखडलेली कामे मार्गी लागतील

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 14, 2024 12:19 PM IST

Lucky Rashi Today 14 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा संयोग या ५ राशींसाठी फलदायक ठरेल. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत ज्यांना नशीबाची साथ लाभेल.

Lucky Rashi Today 14 january 2024
Lucky Rashi Today 14 january 2024

आज रविवार १४ जानेवारी रोजी, चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच आज भोगीचा सण साजरा केला जाणार असून, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी देखील आहे, या दिवशी चंद्र षष योग, रवियोग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, यामुळे आजचे महत्त्व वाढले आहे.अशात ५ राशींसाठी आनंदाचा दिवस आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात संपत्तीसंबंधी विचार प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसाय विस्तार होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. आर्थिक बाबतीत वृद्धी होईल.

मिथुन: 

आज समाजात मान मिळेल. नवे मार्ग सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.

तूळ: 

आज ग्रहयोग उत्तम साथ देतील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांची अपेक्षित प्रगती होईल.

वृश्चिक: 

आज ग्रह-नक्षत्र युतीत आर्थिक स्थिती बरी राहील. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना लाभदायक काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक वृद्धी होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे.

मकर: 

आज ग्रह-नक्षत्राच्या युतीत आर्थिक लाभ होईल. मेहनतीने प्रगती कराल. तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळेच उत्साही आणि आनंदी लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. यश निश्चित लाभेल. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)