Lucky Zodiac Signs : आर्थिक तेजी राहील, कामाचा दर्जा सुधारेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी बुधवार-lucky zodiac signs today 14 august 2024 astrology predictions for mithun kark kanya makar meen rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आर्थिक तेजी राहील, कामाचा दर्जा सुधारेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी बुधवार

Lucky Zodiac Signs : आर्थिक तेजी राहील, कामाचा दर्जा सुधारेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी बुधवार

Aug 14, 2024 07:03 AM IST

Lucky Rashi Bhavishya 14 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. श्रावण महिन्याचा दुसरा बुधवार कोणत्या ५ राशींसाठी लकी राहील जाणून घ्या.

लकी राशीभविष्य १४ ऑगस्ट २०२४
लकी राशीभविष्य १४ ऑगस्ट २०२४

चंद्र वृश्चिक राशीत राहणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मिथुनः 

आज लाभदायक दिवस ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 

कर्कः 

आज रखडलेली कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. 

कन्याः 

आज धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. 

मकरः 

आज प्रगती होऊ शकते. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

मीनः 

आज कामाचा दर्जा सुधारेल. चैनीचे जीवन जगावेसे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहइच्छूकांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक लाभ होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. ल.