Lucky Zodiac Signs : यश मिळेल, कामाचे कौतुक होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभाचा दिवस-lucky zodiac signs today 13 september 2024 astrology predictions for mesh mithun kark dhanu kumbh rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : यश मिळेल, कामाचे कौतुक होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभाचा दिवस

Lucky Zodiac Signs : यश मिळेल, कामाचे कौतुक होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभाचा दिवस

Sep 13, 2024 10:09 AM IST

Lucky Rashi Bhavishya 13 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी असून, या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२४

आज शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी, चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून, या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.

मेषः 

आज सौभाग्य योगात जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. रोजगारात घरात एखादी चांगली खरेदी कराल. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल.

मिथुनः 

आज नोकरीत वरिष्ठ खूश होतील आणि त्याचा फायदा कामासाठी होईल. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. कामकाजामध्ये वाढ होईल. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील, ज्यांचा भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिवस आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल.

कर्कः 

आज रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाची गती वाढून फायदा होईल. वेगवेगळ्या संधी चालून येतील. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल. कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे.

धनुः 

आज आर्थिक आवक चांगली राहील. पैसा मिळेल. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल.

कुंभ: 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढेल. आर्थिक फायदा होईल. निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. 

Whats_app_banner