Lucky Zodiac Signs : कामे यशस्वी होतील! या ५ लकी राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराटीचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कामे यशस्वी होतील! या ५ लकी राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराटीचा दिवस

Lucky Zodiac Signs : कामे यशस्वी होतील! या ५ लकी राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराटीचा दिवस

Published Oct 13, 2024 10:18 AM IST

Lucky Rashi Bhavishya 13 October 2024 : आज आश्विन मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून, पाशांकुशा एकादशी व्रताच्या दिवशी गुरु शुक्र समसप्तक योगासह शश योग आणि घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे, अशात या ५ राशीच्या लोकांना दिवस लाभदायक ठरेल.

लकी राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४
लकी राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४

आज रविवार १३ ऑक्टोबर रोजी, गुरू आणि शुक्र एकमेकांच्या सातव्या घरात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला पाशांकुशा एकादशीचे व्रत पाळले जाते. पाशांकुशा एकादशी व्रताच्या दिवशी गुरु शुक्र समसप्तक योगासह शश योग आणि घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

वृषभः 

आज मन प्रसन्न राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. प्रसिद्धि मिळेल.

मिथुनः 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

कर्कः 

आज घर किंवा वाहन खरेदी कराल. धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. आर्थिक ओढाताण संपेल. प्रगतीकारक दिवस आहे.

तूळ: 

आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. यशस्वी दिवस आहे. 

वृश्चिकः 

आज शुभ कामासाठी दिवस मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेक ठेऊन वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. 

Whats_app_banner