Today lucky zodiac signs : गणपतीच्या कृपेने या ५ राशीच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा; विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : गणपतीच्या कृपेने या ५ राशीच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा; विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस

Today lucky zodiac signs : गणपतीच्या कृपेने या ५ राशीच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा; विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा दिवस

Published Mar 13, 2024 03:27 PM IST

Lucky Rashi Today 13 march 2024 : आज १३ मार्च २०२४ बुधवार रोजी उत्तम ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना दिवस लाभदायक ठरेल. या नशीबवान राशी कोणत्या ते जाणून घ्या.

आजचे लकी राशीभविष्य १३ मार्च २०२४
आजचे लकी राशीभविष्य १३ मार्च २०२४

आज बुधवार १३ मार्च रोजी, चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे, जेथे गुरु आधीच उपस्थित आहे, ज्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. आज विनायक चतुर्थीसह, आंद्र योग, रवि योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्व वाढले आहे. या ५ राशींच्या लोकांसाठी लाभदायक दिवस आहे.

मेषः 

आज आंनदाची बातमी मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक लाभाचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मन प्रसन्न असेल. 

वृषभः 

आज स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. चांगली संधी मिळेल. भरभराट होण्याची शक्यता आहे. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. ग्रंथ लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्यार्थी विद्याभ्यासात प्रगती करतील. 

मिथुनः 

आज नोकरी व व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. यश निश्चित लाभेल. प्रवासातून लाभ होईल. आर्थिक मदत मिळेल.

कर्कः 

आज गणेश कृपेमुळे आणि ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात दिवस उत्तम राहील. उत्पन्न वाढविण्यात यश येईल. समाजात नावलौकीक मिळाल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार नफेत राहील. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण मन प्रसन्न करेल. आर्थिक बाजु भक्कम राहील.

तूळ: 

आज लाभदायक दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे गती घेतील. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. प्रगतीकारक दिवस असून अचानक आर्थिक लाभ घडतील.

Whats_app_banner