जोतिष शास्त्रानुसार आज गुरुवारच्या दिवशी दुपारी २ वाजून ७ मिनिटांपासून ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. अशातच आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थान बदलातून आज वज्र योग, नवमपंचम योग, गरज करणची निर्मिती होत आहेत. या योगांचा शुभ आणि अशुभ परिणाम राशीचक्रातील बाराही राशींवर होणार आहे. आज कोणत्या राशींवर शुभ प्रभाव असणार आणि कोणत्या राशी नशीबवान ठरणार ते जाणून घेऊया.
आज ज्येष्ठ सप्तमीचा दिवस मेष राशीसाठी फलदायी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील. त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी असेल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या बुद्धी चातुर्याने लोकनाना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. दिवसभरात शुभ आणि आनंददायक बातम्या कानावर पडतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना लोकांना आज बढती मिळण्याचा योग आहे. व्यवसायात भावनिक होऊन विचार न करता बौद्धिक दृष्टिकोन ठेवल्यास लाभ संभवतो. लेखन क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल.
आज गुरुवारचा दिवस कर्क राशीसाठी प्रगतिकारक असणार आहे. चंद्राचा शनीशी संयोग होत असून, शनीची चंद्रावर शुभ दृष्टी असणार आहे. याचा फायदा कर्क राशीला मिळणार आहे. अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आज मिळेल. व्यवसायात कामे वेळेवर पूर्ण केल्याने मोठा आर्थिक नफा मिळेल. परदेशी व्यवहार असणाऱ्यांना आज चांगला फायदा मिळणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुपट्टीने वाढेल. घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे अभिमान वाटेल. जोडीदारासाठी आज महागडी खरेदी कराल.
आज गरज करणात सिंह राशीसाठी दिवस असणार आहे. वडिलांकडून आज आर्थिक लाभ आणि मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेल्या कामांमध्ये भावंडांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. कार्यक्षेत्रात शत्रू डोके वर काढतील. मात्र सूचकपणामुळे त्यांचे कट उधळून लावण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक कार्यांमध्ये मनमोकळेपणाने पैसे खर्च कराल. अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढून मनशांती लाभेल. सासरकडून आज तुम्हाला आर्थिक पाठिंबा मिळेल. एकमेकांवरील विश्वास आणखी दृढ होईल.
आज वज्र योगात तूळ राशींसाठी दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. शिवाय काहींना पदोन्नती होऊन पगारवाढ होईल. लव्ह लाईफमध्ये आज काहीतरी खास घडण्याची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रात असणाऱ्यांना आज चांगले यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याची योजना आखाल. आपल्या लोकांसोबत वेळ चांगला जाईल.व्यवसायिकांना नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. तुमच्या हातातून अध्यात्मिक गोष्टी घडतील. मन आनंदी आणि उत्साही असेल.
चंद्र-शनी योगात आज कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींकडून प्रेम आणि आपुलकी प्राप्त होईल. स्थावर संपत्तीच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल. त्यातून येत्या काळात बढती होण्याची शक्यता आहे. पतीपत्नींमध्ये प्रेम आणि आदर वाढून गृहसौख्य लाभेल. संगीत आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे व्यासपीठ लाभेल. तुमच्या कार्यप्रणालीत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा होईल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल.