आज १३ जुलै २०२४ शनिवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, शिवयोग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील.
आज आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम असल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे.
आज चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल.
आज फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरेल. जुनी येणी अचानक वसूल होतील. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या