मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: सिद्धी योगात शनिवारचा दिवस या ५ राशींसाठी भरभराटीचा

Today lucky zodiac signs: सिद्धी योगात शनिवारचा दिवस या ५ राशींसाठी भरभराटीचा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 13, 2024 11:01 AM IST

Lucky Rashi Today 13 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा संयोग या ५ राशींसाठी वृद्धीदायक ठरेल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 13 january 2024
lucky zodiac signs today 13 january 2024

आज, शनिवार, १३ जानेवारी रोजी मकर राशीनंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी असून, या दिवशी सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, बुद्धादित्य योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्व वाढले आहे. अशात ५ राशींसाठी लाभदायक दिवस आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्र उत्तम असल्याने नोकरीत कौतुकास पात्र ठराल. कलाकारांना संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. धंद्यामध्ये तुमची बौद्धीकता आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वृद्धी करणारा दिवस राहील. आपणास मेहनतीनुसार चांगला लाभ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक जीवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कर्क: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मक परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. 

सिंहः 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ योगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. तुमच्या स्वभावामुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होईल. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहील. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

धनुः 

आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. 

कुंभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात सर्व गोष्टी तडीस न्याल. भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी गोष्ट व्हावी अशी इच्छा असेल ती पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल लाभदायक ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)