मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : माघी गणेश जयंती, या ५ राशींवर बाप्पा होतील प्रसन्न, मनोधैर्य उंचावेल

Today lucky zodiac signs : माघी गणेश जयंती, या ५ राशींवर बाप्पा होतील प्रसन्न, मनोधैर्य उंचावेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 13, 2024 03:02 PM IST

Lucky Rashi Today 13 february 2024: आज १३ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींवर बाप्पाची राहील अपार कृपा.

lucky zodiac signs today 13 february 2024
lucky zodiac signs today 13 february 2024

आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी, चंद्र मीन राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे आणि ही तिथी माघी गणेश जयंती, विनायकी गणेश चतुर्थी व्रत म्हणून ओळखली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींना नशीबाची चांगली साथ मिळेल.

मेषः 

आज व्यवसायात केलेल्या कष्टाचे लाभ मिळणार आहेत. त्यामुळे आनंदी व उत्साही व्हाल. सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल. कामात यश मिळेल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल.

मिथुन: 

आज रखडलेले पैसे हाती येतील. आर्थिक प्रगती होईल व स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल व बढतीचे योग आहेोत.

मकरः 

आज आनंद व उत्साहात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकेल. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक सुखशांती राहील व आनंददायक वातावरण राहील.

कुंभ: 

आज मनोधैर्य वाढेल व आर्थिक स्थिती सुधारेल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी पदोन्नती व बदली होऊ शकते. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. 

मीन: 

आज आत्मविश्वास वाढेल. प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे.

विभाग