Lucky Zodiac Signs : आनंदी राहाल, नावलौकीक वाढेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी दिवस-lucky zodiac signs today 13 august 2024 astrology predictions for mesh vrishabh sinh kanya vrishchik rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आनंदी राहाल, नावलौकीक वाढेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी दिवस

Lucky Zodiac Signs : आनंदी राहाल, नावलौकीक वाढेल! या ५ राशीच्या व्यक्तींसाठी लकी दिवस

Aug 13, 2024 04:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 13 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. श्रावण महिन्याचा दुसरा मंगळवार कोणत्या ५ राशींसाठी लकी राहील जाणून घ्या.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १३ ऑगस्ट २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १३ ऑगस्ट २०२४

आज चंद्राचे मंगळाच्या वृश्चिक राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, धनु आणि इतर ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मेष: 

आज मोठी आर्थिक गुंतवणुकी करिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. व्यवसायात ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्य पूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे.

वृषभ: 

आज नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. 

सिंह: 

आज प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमी जनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. विद्याभ्यासात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल.

कन्या: 

आज स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. 

वृश्चिकः 

आज नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. फायदा होईल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे.