Lucky Zodiac Signs : आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल, विजय मिळवाल! या ५ लकी राशींना शुभ लाभाचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल, विजय मिळवाल! या ५ लकी राशींना शुभ लाभाचा दिवस

Lucky Zodiac Signs : आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल, विजय मिळवाल! या ५ लकी राशींना शुभ लाभाचा दिवस

Published Sep 12, 2024 09:27 AM IST

Lucky Rashi Bhavishya 12 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी असून, या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १२ सप्टेंबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १२ सप्टेंबर २०२४

आज गुरुवार १२ सप्टेंबर रोजी, चंद्राचे देवगुरु गुरुच्या धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून, या तिथीला आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मिथुन: 

आज दिवस शुभ लाभदायी असणार आहे. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून नफा होईल. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.

सिंहः 

आज आज भाग्याची साथ लाभेल. आर्थिक बाबतीत अनुकुलता राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रवासाच्या संधी मिळतील. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन, आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळेल. लाभ होईल, मान-सन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

तूळ: 

आज भाग्यदायक घटना घडतील. आर्थिक लाभ घडेल. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. तुमच्या नवीन कल्पनेचं स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. 

धनुः 

आज शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन संधींची साथ लाभेल. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. स्वभावामुळे फायदा होईल. मन प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. 

कुंभ: 

आज आर्थिक गुंतवणूक कराल. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल, आत्मविश्वास उंचावलेला असेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. 

Whats_app_banner