आज रविवार १२ मे २०२४ रोजी, मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाणार आहे आणि मेष राशीत सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे, त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. याशिवाय आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची पाचवी तिथी असून या दिवशी रवियोग, बुधादित्य योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. आज विविध गोष्टींमधून सुख-समाधान लाभेल. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबियांसोबत वेळ चांगला जाईल. विविध मनोरंजक गोष्टी करण्यावर भर द्याल. एखाद्या कामात ध्येय प्राप्त करण्यासाठी मित्रांची मदत मिळेल. त्यामुळे मित्रांवरील विश्वास आणखी वाढेल. कामाच्या धावपळीत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळावे लागेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमन अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तयार होत असलेल्या शशी राजयोगाचा प्रभाव वृषभ राशीवरसुद्धा राहणार आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल. आज शुल योगात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. हातात घेतलेल्या कामात सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांचा लोक आदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. कामानिमित्त परदेशगमनाचे योग घडून येतील. या यात्रेतून फायदाही होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल.
तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. महत्वाच्या कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करुन ती पूर्ण करण्यावर भर द्याल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना आज शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. अनुकूल ग्रहयुतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कोणत्याही कार्यात कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी लागून राहील. जोडीदारासोबत संवाद साधून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुमच्या नातेसंबंधात अधिक मजबुती येईल. सायंकाळच्या वेळी धार्मिक कार्यांमध्ये मन रमेल.
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज धृती योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. उद्योगधंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना काम केल्याचे समाधान लाभेल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश येईल. सामाजिक कार्यांची आवड असल्यामुळे लोकांवर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रामध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्यामुळे विवेकबुद्धी ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजनेची सुरुवात कराल.
मकर राशीच्या लोकांना आज चंद्र संक्रमणात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही सापडेल. त्यामुळे कष्टाचे वाईट वाटणार नाही. कामात अचानक झालेले बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात पुरेसा वेळ देता न आल्याने मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. मात्र कामकाजाचा विस्तार होईल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. मनात असलेल्या नवीन कल्पना वरिष्ठांसमोर नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे.
संबंधित बातम्या