आज मंगळवार १२ मार्च रोजी चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मायोग, रवियोग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या ५ राशींच्या लोकांना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज नवीन घर खरेदीचा योग आहे. प्रसिद्धी मिळेल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील यशाने आनंदी राहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. संगीतकार व गायक-वादक यांना संधी मिळेल. शेअर्स मधील गुंतवणूकीसाठी उत्तम दिवस आहे. संततीसंबंधी आनंदाची बातमी मिळेल.
आज अडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. आपले कर्तुत्व सिद्ध कराल. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणी कडून आर्थिक सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील. व्यापारात नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे.
आज महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश येईल. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. मुलांच्या बाबतीत आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. फिरण्याचा उत्तम योग आहे. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखनाची आवड वाढेल.
आज अनेक जणांचे सल्लागार बनाल. घरगुती उपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन योजनेचा शुभारंभ होईल. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी मिळतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील.
आज ब्रह्मा योगात नशीबाची साथ लाभेल. स्थावर मालमत्ता संबंधातील समस्या दूर होतील. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. कलाकारांना योग्य संधी मिळतील.