जोतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्र एका राशीतून दुसऱ्या राशीत सतत संक्रमण करत असतात. त्यामुळे विविध योग घटित होत असतात. हे योग राशीचक्रातील बारा राशींवर प्रभाव पाडत असतात. अशातच काही राशींसाठी दिवस अत्यंत लाभदायक असतो, तर काही राशींसाठी दिवस अति सामान्य असतो. आजसुद्धा ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे हर्षण योग, नवमपंचम योग, बुधादित्य योग, गुरुआदित्य योग, गजकेसरी योग असे विविध शुभ योग जुळून आले आहेत. या योगांचा परिणाम काही राशींवर अत्यंत शुभ स्वरुपाचा असणार आहे. त्या ५ नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
आज हर्षण योगात वृषभ राशीच्या लोकांना दिवस उत्तम असणार आहे. तुम्हाला सुखसोयींमध्ये वाढ होताना दिसेल. घरामध्ये महागड्या ऐषारामी वस्तूंची खरेदी कराल. पतिपत्नींमध्ये प्रेम आणि आदर वाढेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रचंड मेहनत कराल. त्यामुळेच वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. मात्र तुम्ही विरोधकांना वरचढ ठरण्यात यशस्वी व्हाल. घरामध्ये काही शुभ कार्य घडून येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यास आजचा दिवस चांगला आहे.
आज चंद्र-मंगळ संयोगात कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस समाधानकारक असणार आहे. कर्जाची परतफेड करण्यात आज यशस्वी व्हाल. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळून आरोग्य सुधारेल. सामाजिक कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. समाजपयोगी काम करत असल्याने समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसायात फायदा होऊन धनलाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. एखाद्या गुंतवणुकीतूनसुद्धा आज लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.
नवमपंचम योगात वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस शुभ लाभदायक असणार आहे. आज तुमची लव्ह लाईफ बहरणार आहे. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन प्रेम आणि आदर वाढीस लागेल. तसेच विवाहित लोकांसाठीसुद्धा आजच्या दिवस चांगला असणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायिकांना मोठा आर्थिक नफा मिळेल. अनपेक्षित धनलाभ झाल्याने आत्मविश्वास वाढेल. घरामध्ये एखादा पाहुणा आल्याने आनंदी वातावरण असेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. भावंडांकडून आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज महत्वाच्या कामामध्ये भावंडाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला अचानक धनलाभ होईल. त्यामुळे मन उत्साही राहील. कामामध्ये काही अडचणी येतील मात्र संयमाने त्याला तोंड द्याल. आज तुमचा मूड कलात्मक आणि रचनात्मक स्वरुपाचा राहील. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगले व्यासपीठ मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्यासोबत मनोरंजनात्मक वेळ जाईल. लव्ह लाईफमध्ये आज एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. कौटुंबिक कामानिमित्त प्रवास करण्याचा योग येईल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. मुलांकडून आज एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. तसेच मित्रांच्या ओळखीतून व्यापारीवर्गाला मोठा प्रकल्प मिळेल. घरामध्ये सुखसोयींचा वस्तूची खरेदी कराल. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. कमाईचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा उंचावेल. तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. शिवाय तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळेल. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल.
संबंधित बातम्या