आज १२ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी व सप्तमी तिथी असून या दिवशी रवियोग, शिवयोग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्याचा फायदा होईल. या राशीच्या व्यक्ती लकी ठरतील.
आज जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. मोठे यश प्राप्त होईल.
आज मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.
आज मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. संधी मिळेल. प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील.
आज कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. आपला स्वभाव फार उदारमतवादी राहील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल.
आज मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. कामकाजासाठी शुभ दिवस आहे.
संबंधित बातम्या