मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: पौष प्रतिपदा, ग्रह-नक्षत्राच्या संयोगात या ५ राशींसाठी धनलाभाचे प्रबळ योग

Today lucky zodiac signs: पौष प्रतिपदा, ग्रह-नक्षत्राच्या संयोगात या ५ राशींसाठी धनलाभाचे प्रबळ योग

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 12, 2024 11:17 AM IST

Lucky Rashi Today 12 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा संयोग या ५ राशींसाठी शुभ ठरेल. जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

Today Lucky zodiac signs 12 January 2024
Today Lucky zodiac signs 12 January 2024

आज, शुक्रवार १२ जानेवारी रोजी, चंद्र शनीच्या मकर राशीत भ्रमण करत आहे. तसेच पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, हर्षन योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. अशात ५ राशींसाठी लाभदायक दिवस राहील.

वृषभ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात अडकलेले पैसे हाती येतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. भरभराट होण्याची शक्यता असून, बढतीचे योग आहे. आर्थिक प्रगती व मान-सन्मानाचा दिवस आहे.

मिथुनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात स्वत:ची मते बिनधास्त मांडाल. आध्यात्मिक उंची गाठाल. प्रवासाचे नियोजन कराल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील अडचणी दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. पदोन्नतीचे योग आहेत.

सिंह: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात आध्यात्मिक उंची गाठाल. आपल्या मताशी ठाम रहाल. दुसऱ्यांना तुमचा आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात यश मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवासाचे योग आहेत.

मकर: 

आज उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी पदोन्नती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. 

मीनः 

आज ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही असाल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. कामात यशस्वी राहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान-सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. रोजगारात नवीन योजना राबवाल. कौटुंबिक सुख-शांती मिळेल. धावपळ फायदेशीर राहील. 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)