मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : सिद्ध व साध्य योगात या ५ राशी होतील मालामाल, प्रसिद्धीही मिळेल

Today lucky zodiac signs : सिद्ध व साध्य योगात या ५ राशी होतील मालामाल, प्रसिद्धीही मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 12, 2024 03:59 PM IST

Lucky Rashi Today 12 february 2024: आज १२ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना सप्ताहाचा पहिला दिवस फायदेशीर ठरेल.

lucky zodiac signs today 12 february 2024
lucky zodiac signs today 12 february 2024

आज सोमवार १२ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाणार आहे. याशिवाय माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी रवियोग, सिद्धयोग, साध्ययोग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा फायदा होणार आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

मिथुनः 

आज उत्तम ग्रहयोगात बरीच कामे पूर्ण होतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.

कन्या: 

आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळाच उत्साह आणि आनंद लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल व आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. यश निश्चित लाभेल.

वृश्चिक: 

आज कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल.

धनु: 

आज प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. प्रेमप्रकरणात यश येईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.

कुंभः 

आज समाजात मान मिळेल. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.