आज चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार असून, बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे धन लक्ष्मी योगही तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून, दुसरा श्रावण सोमवार आहे. या दिवशी धन लक्ष्मी योगासोबत शुक्ल योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे गुंतवणूक करायला हरकत नाही. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. प्रवासाचे योग आहेत.
आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आज घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.
आज घरासंबंधी समस्या दूर होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. परदेशगमनाचे योग येतील. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल.