आज बुधवार ११ सप्टेंबर रोजी, चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून, या दिवशी गौरी पूजनाचा सण साजरा केला जातो.
महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी रवियोग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.
आज इच्छित फळ मिळणार आहे. मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिक होईल.
आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. पत्नीकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल.
आज चांगले सहकार्य मिळेल. जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील.
आज प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे.
आज अनुकुल फळ प्राप्त होतील. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करू शकता. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. आनंदी राहाल.