आज शनिवार ११ मे २०२४ रोजी, आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थ तिथी म्हणजेच विनायक चतुर्थी आहे. आजच्या दिवशी अनेक राशींवर श्रीगणेशाची विशेष कृपा असणार आहे. सोबतच आज बुध आणि शुक्र मेष राशीत विराजमान असणार आहेत. यांच्या संयोगाने लक्ष्मी-नारायण योग घटित होत आहे. तसेच आज सुकर्मा योग, रवी योग आणि मृगधिरा योगसुद्धा जुळून येत आहे. या सर्व शुभ योगांचा फायदा राशीचक्रातील पाच राशींवर होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.
चंद्राचे संक्रमण आज मिथुन राशीसाठी शुभ ठरणार आहे. रखडलेली कामे आज मार्गी लागतील. दिवसभरातील प्रयत्नांना यश मिळेल. हातातून निसटलेल्या जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी बढती मिळेल. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये मानसन्मान वाढेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होईल. आज उद्योग-व्यवसायांत केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. मेहनतीपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना निश्चित यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कलाकारांची कला नावाजली जाईल. नवनवीन कल्पना सुचतील. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. तुमची कार्यक्षमता वाढेल.
आजच्या नशीबवान राशींच्या यादीत सिंह राशीचा सुद्धा समावेश होतो. सिंह राशीसाठी आज विनायक चतुर्थीचा दिवस शुभ असणार आहे. कामातील चोखपणा आणि कलाकौशल्य पाहून वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. व्यावसायिक लोकांना आज मोठा आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दिवसभर उत्साही राहाल. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. मनामध्ये सकारात्मक विचार येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्याची इच्छा आज पूर्ण होईल. घरात थोडेसे मतभेद जाणवतील. परंतु तुमच्या सामंजस्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल.
तूळ राशीसाठी आज शनिवारचा दिवस चांगला असणार आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम जाईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. जोडीदारासोबत भावनात्मक संवाद होऊन नाते आणखी दृढ होईल. व्यवसायिकांना भागीदाराकडून कामात सहकार्य लाभेल. त्यामुळे मनावरचा ताण दूर होईल. मिळून काम केल्याने व्यवसायात स्थिरता येईल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली पैशांची कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने मन प्रसन्न राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास जातील. जोडीदारासोबत झालेले मतभेद संपुष्ठात येऊन प्रेम वाढीस लागणार आहे. आरोग्य अगदी उत्तम असल्याने मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहील. कोणत्याही कामात अतिउत्साहीपणा दाखवू नये अथवा नुकसान होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना विशेष लाभ होणार आहे. नोकरदारवर्गाला नव्या संधी उपलब्ध होऊन आत्मविश्वास वाढेल.
आज शनिशी होणारा चंद्राच्या योग पाहता कलाकारांच्या कलेला चांगली संधी मिळेल. लेखक कलावंतांनानवे प्रकल्प हाती लागतील. कामामध्ये झालेला बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. अध्यात्मिक कार्यांत अधिक स्वारस्य दाखवाल. घरामध्ये मंगल कार्य घडून येतील. व्यावसायिकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. मुलांसोबत विचार न जुळल्याने मतभेद होऊ शकतात. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील.
संबंधित बातम्या