मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : चंद्रदर्शनाचा शुभ योग या ५ राशींसाठी भाग्याचा, आर्थिक अडचण दूर होईल

Today lucky zodiac signs : चंद्रदर्शनाचा शुभ योग या ५ राशींसाठी भाग्याचा, आर्थिक अडचण दूर होईल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 11, 2024 01:17 PM IST

Lucky Rashi Today 11 march 2024: आज ११ मार्च २०२४ सोमवार रोजी उत्तम ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना दिवस फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

आजच्या नशीबवान राशी ११ मार्च २०२४
आजच्या नशीबवान राशी ११ मार्च २०२४

आज सोमवार ११ मार्च रोजी, चंद्र गुरू ग्रहाच्या मीन राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी शुक्ल योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या शुभ योगात ५ राशींना लाभ मिळेल.

मेषः 

आज महत्वाची कामे पूर्ण होण्याचा योग आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून, मानसन्मान वाढेल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास लाभदायक होतील.

वृषभः 

नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. सहकार्य लाभेल. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. 

मिथुनः 

आज मोठे आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. आज उत्पन्नात वाढ होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून व वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. कामकाजात यश प्राप्त होईल. मान-सन्मानात वाढेल. 

सिंह: 

आज व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. पत्नीची साथ मिळेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. आर्थिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

कन्याः 

आज भांवडाकडून सहकार्य लाभेल. चांगली संधी मिळू शकते. लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल. मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार प्रस्ताव येतील. मान सन्मान मिळेल. नोकरीत प्रमोशन होईल. 

WhatsApp channel