एका ठराविक काळानंतर ग्रह-नक्षत्र आपले स्थान बदलत असतात. या स्थानबदलातून विविध योग आणि तिथी जुळून येत असतात. आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीबाबत सांगायचे तर, आज मेष राशीमध्ये मंगळ ग्रह स्थित आहे. तर वृषभ राशीमध्ये सूर्य, बुध, गुरु, शुक्र विराजमान आहेत. कन्या राशीमध्ये केतू आणि मीन राशीत राहू आहेत. तर आज कुंभ राशीमध्ये शनी स्थित आहेत. या सर्व ग्रहांच्या हालचालींमध्ये नवमपंचम योग, व्याघात योग, रुचक राजयोग असे विविध शुभ योग जुळून आले आहेत. या योगांचा परिणाम राशीचक्रातील काही राशींवर अत्यंत शुभ असणार आहेत. पाहूया आजच्या या ५ लकी राशी कोणत्या आहेत.
आज रुचक राजयोगात मंगळवारचा दिवस मेष राशीसाठी लाभदायक असणार आहे. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नातेवाईकसुद्धा शुभ वार्ता देऊ शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढीची शक्यता आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहील. कोणत्याही कामात आज जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम वाढेल. अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. सामाजिक कार्यांमध्ये भाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकंदरीत आज भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे.
आजच्या शुभ योगात वृषभ राशीला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रात यशाची दारे तुमच्यासाठी खुली होतील. मुलांच्या चांगल्या वागणुकीमुळे समाधान लाभेल. तसेच मुलांच्या प्रयत्नांतून तुम्हाला यश आणि लाभ दोन्ही मिळतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंददायक असणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल. मात्र अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच संध्यकाळचा वेळ धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींमध्ये घालवाल.
आज राहू चंद्र योगात तूळ राशीसाठी फायद्याचा दिवस आहे. अनेक दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. नोकरीत मोठे पद मिळून मानसन्मान वाढेल. भूतकाळात हातातून निसटलेल्या संधी पुन्हा नव्याने उपलब्ध होतील. त्याने आत्मविश्वास प्रचंड वाढेल. क्रीडा आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगले व्यासपीठ मिळून प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. घरामध्ये ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे काम करण्यात आणखी उत्साह वाटेल.
रुचक राजयोगात आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुम्हाला आज कुटुंबातील सदस्यांचे प्रचंड प्रेम मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे असेल. नोकरीमध्ये बढती मिळून पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे आणि बुद्धी चातुर्याचे कौतुक होईल. तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. काही दिवसांपासून रखडलेली कामे आज मार्गी लागतील.
आज चंद्र राहु योगात तुमच्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल.बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. विरोधकांच्या चाली उलटून लावण्यात यशस्वी व्हाल.