आज ११ जुलै २०२४ गुरुवार रोजी, चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असल्याने या दिवशी गजकेसरी योग, रवियोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग या ५ राशींना लाभदायक ठरणार आहे.
आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहील. देश-विदेशात फिरायला जाण्याची शक्यता आहे.
आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
आज नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील.
आज तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा घ्याल. तुम्ही वरचढ ठरणार आहात. वैवाहिक सुखात वाढ होईल. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. व्यापाराचा विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल.
आज वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
संबंधित बातम्या