आज, गुरुवार ११ जानेवारी रोजी, मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, चंद्र धनु राशीत विराजमान आहे. या दिवशी गुरु सूर्याचा नवमपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोग, हर्ष योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींसाठी शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग बौद्धीक गोष्टींवर भर देईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी योग्य मार्ग फायदेशीर राहील. कामाची शाबासकी मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी कौतुकास्पद पार पाडाल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार होईल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. मनावरचा ताण कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्य आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा येईल.
आज ग्रह-नक्षत्राचा बदल जीवनात लाभाचा ठरेल. उत्साह अंगी संचारेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. शब्दातील गोडवा इतरांवर छाप पाडेल. घरात आणि घराबाहेर आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून मदत मिळेल. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
आज ग्रह-नक्षत्राचा बदल शुभ फलदायी घटना घडवणार आहे. तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मेहनत कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा मान-सन्मान वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडेल. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात लाभ मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या संयोगात फायद्याचे प्रमाण वाढेल. आत्मविश्वास उत्तम राहील. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कामे जबाबदारीने वेळेत पूर्ण कराल. नवीन योजनांना यश मिळेल. व्यवसाय यशस्वी होईल. नवनवीन संधी उपलब्ध होतील. पदोन्नतीचे शुभ योग आहेत. व्यवसाय नफेत राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)