मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : शिवयोग ठरेल आर्थिक भरभराटीचा! या ५ राशींना रविवारचा दिवस बक्कळ लाभाचा

Today lucky zodiac signs : शिवयोग ठरेल आर्थिक भरभराटीचा! या ५ राशींना रविवारचा दिवस बक्कळ लाभाचा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 11, 2024 01:58 PM IST

Lucky Rashi Today 11 february 2024: आज ११ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींना रविवार लाभदायक आहे.

lucky zodiac signs today 11 february 2024
lucky zodiac signs today 11 february 2024

आज रविवार ११ फेब्रुवारी रोजी चंद्र शनीच्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. याशिवाय आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी षष्ठ योग, शिवयोग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. ग्रह नक्षत्राच्या शुभ योगात ५ राशींना आज लाभ मिळेल.

मेषः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात खरेदी आणि शुभ कामासाठी मंगलमय दिवस आहे. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. तुमची विलक्षण छाप जनमानसावर पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजनेची सुरुवात कराल. प्रवासाचे योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभः 

आज रखडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूं कृपा राहील. देश-विदेशात फिरण्याचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. अध्यापनामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील.  आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. स्नेह वाढेल. मन समाधानी व प्रसन्न राहील. कौटुंबीक सोख्य प्राप्त होईल.

मिथुनः 

आज ग्रहयोग उत्तम आहे. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होऊ शकते. मोठा आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. सहकार्य लाभेल.

कर्कः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीचा दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 

कुंभः 

आज अनेक अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील.  फायदेशीर दिवस ठरेल. कौटुंबीक वातावरण चांगले राहील.