आज चंद्र शुक्राच्या तूळ राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून, या दिवशी रवियोग, द्विपुष्कर योग, शुभ योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ योग होत आहे, त्यामुळे दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज अनपेक्षित यश मिळेल. ग्रहांची साथ चांगली लाभेल. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. व्यवसायात अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील.
आज दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल.
आज प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस विशेष कृपा कारक आहे.
आज यश मिळेल. कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.
आज जुनी येणी वसूल होतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापार लाभदायक ठरेल.