Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होईल, प्रकृतीत सुधारणा होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभ घडेल
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होईल, प्रकृतीत सुधारणा होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभ घडेल

Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होईल, प्रकृतीत सुधारणा होईल! या ५ लकी राशींना आर्थिक लाभ घडेल

Published Sep 10, 2024 09:27 AM IST

Lucky Rashi Bhavishya 10 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा आहे.

लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० सप्टेंबर २०२४
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० सप्टेंबर २०२४

आज मंगळवार १० सप्टेंबर रोजी, चंद्राचे मंगळच्या वृश्चिक राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून, गौरी आवाहन आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेष: 

आज कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. उत्तम दिवस आहे. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. 

वृषभ: 

आज प्रमोशन मिळण्याचे योग येतील. जुनी येणी वसूल होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. यश मिळेल.

कर्कः 

आज व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. 

तूळ: 

आज वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. 

वृश्चिक: 

आज परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

Whats_app_banner