मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : अमावस्येला मिळेल आर्थिक पाठबळ, या ५ राशींचा आत्मविश्वास वाढेल

Today lucky zodiac signs : अमावस्येला मिळेल आर्थिक पाठबळ, या ५ राशींचा आत्मविश्वास वाढेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 10, 2024 12:48 PM IST

Lucky Rashi Today 10 march 2024: आज १० मार्च २०२४ रविवार रोजी अमावस्येला होणाऱ्या ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना दिवस लाभदायक ठरेल.

लकी राशीभविष्य १० मार्च २०२४
लकी राशीभविष्य १० मार्च २०२४

आज रविवार १० मार्च रोजी कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून या तिथीला माघी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी साध्य योग, शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. आज शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना फायदा होणार आहे.

मिथुनः 

आज कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण संपेल. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. संततीकडूश शुभ वार्ता मिळेल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत. आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. 

कर्कः 

आज अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. परदेशाशी व्यवहार असणाऱ्या व्यक्तीस फायदा होईल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती, मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळण्याचा दिवस आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही.

सिंह: 

आज घरातील वातावरणही आनंदी राहील. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. प्रयत्नांना यश मिळेल.

कन्या: 

आज वस्तु खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. उधारी वसूल होईल. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. दिवस आनंदात व्यतीत कराल. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील.

कुंभ: 

आज आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. अडचणी दूर होतील. देश-विदेशाचा दौरा फायदेशीर ठरेल. प्रसिद्धीचे योग येतील. उत्तम आध्यात्मिक सुख मिळेल. वडीलोपार्जीत मालमत्तेतून धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. उधारी वसूल होईल.

WhatsApp channel