Lucky Zodiac Signs : धनलाभ होईल, फायदेशीर काळ, बाप्पाची राहील कृपा! पाहा आजच्या लकी राशी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : धनलाभ होईल, फायदेशीर काळ, बाप्पाची राहील कृपा! पाहा आजच्या लकी राशी

Lucky Zodiac Signs : धनलाभ होईल, फायदेशीर काळ, बाप्पाची राहील कृपा! पाहा आजच्या लकी राशी

Jun 10, 2024 01:13 PM IST

Lucky Rashi Bhavishya 10 June 2024 : रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. अशात आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी नशीबवान ठरणार आहे जाणून घ्या.

लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० जून २०२४
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य १० जून २०२४

आज सोमवार १० जून २०२४ रोजी, चंद्र स्वतःच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून, या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे. अशात आज या राशीचे लोक ठरतील लकी.

कर्क: 

आज पुष्य नक्षत्रात कर्क राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. समाजात मान मिळेल. नवे मार्ग सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी करत असलेल्या कामासाठी प्रसिद्धी मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. 

सिंह: 

आज उत्तम चंद्रबलात बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा, निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. 

कन्या: 

आज ध्रुव योगात कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. आर्थिक स्थिती बरी राहील. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. समाजात आपला मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल.

मकर: 

आज ध्रुव योगात आर्थिक घडी बसेल. कलाकरांना संधी मिळतील. यशासाठी जिद्दीने कामाला लागाल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यावसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. 

कुंभ: 

आज नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात यश येईल. कार्याचा विस्तार वाढेल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल.

Whats_app_banner