Lucky Zodiac Signs : रखडलेल्या कामास गती मिळेल! या ५ राशीच्या लोकांना आजचा बुधवार लकी राहील
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : रखडलेल्या कामास गती मिळेल! या ५ राशीच्या लोकांना आजचा बुधवार लकी राहील

Lucky Zodiac Signs : रखडलेल्या कामास गती मिळेल! या ५ राशीच्या लोकांना आजचा बुधवार लकी राहील

Published Jul 09, 2024 11:20 PM IST

Lucky Rashi Bhavishya 10 July 2024 : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून, या दिवशी रवियोग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात आजचा दिवस या ५ राशींसाठी लकी राहील.

लकी राशीभविष्य १० जुलै २०२४
लकी राशीभविष्य १० जुलै २०२४

आज १० जुलै २०२४ बुधवार रोजी, चंद्र सूर्याच्या सिंह राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून, या दिवशी रवियोग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. जाणून घ्या या लकी राशी कोणत्या आहेत.

वृषभ: 

आज धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. परिवारातून शुभ संदेश मिळतील. 

मिथुन: 

आज नोकरीत कौतुकास पात्र ठराल. संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. 

कर्क: 

आज तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती कराल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. 

सिंहः 

आज कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. 

तूळ: 

आज परदेशगमनाचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. 

Whats_app_banner