आज, बुधवार १० जानेवारी रोजी, चंद्र गुरू ग्रहाच्या धनु राशीत भ्रमण करत आहे आणि बुध ग्रह देखील या राशीमध्ये आधीच उपस्थित आहे. धनु राशीमध्ये चंद्र आणि बुध यांच्या संयोगामुळे शुभयोग तयार होत आहेत. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी सौभाग्य योगाबरोबरच ध्रुव योग, चतुर्ग्रही योग, आदित्य मंगल योग आणि मूल नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशात ५ राशींसाठी आजचा दिवस भाग्यदायक ठरेल.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग घडत आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत कराल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होईल. व्यापारात लाभदायक गुंतवणूक मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दुरवरचे प्रवास घडतील. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मान-सन्मान, प्रसिद्धी मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात, परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडेल त्यामुळे मन प्रसन्न राहील.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात भाग्यदायक दिवस जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक संधी मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे, प्रसिद्धी मिळेल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे वरिष्ठ कौतुक करतील.
आज शुभयोगामुळे जोडीदाराला योग्य प्रकारे समजून घ्याल. व्यवसायातील अडचणींवर अनेक मार्ग उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात युक्तीने केलेल्या गोष्टी यशस्वी ठरतील. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापार उद्योगात प्रगती कराल. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीसाठी चांगला दिवस आहे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व लाभ मिळेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या