आज १० ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी, चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत जाणार आहे. तूळ राशीत चंद्राचे आगमन झाल्यानंतर दुपारनंतर बृहस्पति चंद्रापासून आठव्या भावात आल्याने आदि योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी आदियोगासोबतच साध्ययोग, शुभ योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
आज प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. कौटुंबिक जीवनात समृद्धीचा दिवस आहे.
आज ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत व्यापारात आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान सुख लाभेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे.
आज धार्मिक कार्य घडतील. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते.
आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. भावंडाची योग्य साथ मिळेल. काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल.
आज अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. प्रेमप्रकरणात यश येईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील.