आज रविवार १ सप्टेंबर रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच सूर्य स्वतःच्या सिंह राशीत आहे आणि शनि कुंभ राशीत आहे, दोघेही एकमेकांपासून सातव्या भावात असल्यामुळे सूर्य शनीचा समसप्तक योग तयार होत आहे. शनिसोबत सूर्याचे शत्रू घर आहे, यानंतरही सूर्य स्वतःच्या राशीत असल्यामुळे मजबूत स्थितीत असेल, त्यामुळे या ५ राशींसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे.
आज प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. प्रगतीचा दिवस आहे.
आज अचानक धनलाभाची संधी मिळेल. धार्मिक कार्य कराल. आर्थिक गुंतवणूक कराल. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल उंचावलेले असेल.
आज खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. उधारी वसूल होईल. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. आर्थिक धनलाभ होतील.
आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. मनोरंजनाकडे कल राहील. योग्य नियोजनामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. मन प्रसन्न राहील.
आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. आर्थिक आवक वाढेल. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.