Lucky Zodiac Signs : प्रमोशन होईल! या ५ लकी राशींसाठी महिन्याचा पहिला दिवस आर्थिक फायद्याचा-lucky zodiac signs today 1 october 2024 astrology predictions for mesh sinh tula vrishchik dhanu rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : प्रमोशन होईल! या ५ लकी राशींसाठी महिन्याचा पहिला दिवस आर्थिक फायद्याचा

Lucky Zodiac Signs : प्रमोशन होईल! या ५ लकी राशींसाठी महिन्याचा पहिला दिवस आर्थिक फायद्याचा

Oct 01, 2024 08:40 AM IST

Lucky Rashi Bhavishya 1 October 2024 : आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असून, चतुर्दशीच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ लकी राशीच्या लोकांसाठी आर्थिक फायद्याचा राहील.

१ ऑक्टोबर लकी राशीभविष्य
१ ऑक्टोबर लकी राशीभविष्य

आज मंगळवार १ ऑक्टोबर रोजी, चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीत जाईल आणि चंद्र आणि बृहस्पति एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात उपस्थित राहतील, यामुळे चंद्र आणि गुरूचा नवमपंचम योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी श्राद्ध केले जाईल. श्राद्ध पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशीच्या लोकांना नशीबाची साथ लाभेल.

मेष: 

आज मन प्रसन्न राहील. देश-विदेशात फिरणं खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.

सिंह: 

आज मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर सिद्ध होईल. अनुकुल स्थिती राहणार आहे. कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. मुलांकडुन समाधान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.

तूळ: 

आज शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. आपल्या इच्छे प्रमाणे कार्य घडतील. 

वृश्चिकः 

आज आर्थिक लाभ घडतील. लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

धनुः 

आज कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणीं कडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.

Whats_app_banner