मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : महिन्याचा पहिला दिवस या ५ राशींना देईल बक्कळ लाभ, चांगल्या संधीचा दिवस

Today lucky zodiac signs : महिन्याचा पहिला दिवस या ५ राशींना देईल बक्कळ लाभ, चांगल्या संधीचा दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 01, 2024 03:03 PM IST

Lucky Rashi Today 1 march 2024 : आज १ मार्च २०२४ शुक्रवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना भाग्याती उत्तम साथ मिळेल.जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

today lucky zodiac signs 1 march 2024
today lucky zodiac signs 1 march 2024

आज शुक्रवार १ मार्च रोजी चंद्र तूळ राशीत असेल. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी ध्रुव योग, रवियोग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींसाठी आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

वृषभः 

आज लकी राशीभविष्य सांगते की, व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराप्रती प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांची वाचनात गोडी वाढेल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. शासकीय कामकाजा साठी शुभ दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल.

कन्याः 

आज कामाची सुरुवात चांगली होईल. उधारी वसूल होईल. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभेल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. 

धनुः 

आज लकी राशीभविष्य सांगते की, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. लाभदायक गोष्टी घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.

मकरः 

आज दिवसभर मन प्रसन्न राहिल. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. प्रसिद्धीची संधी मिळेल. तुमच्या गुणांना वाव मिळेल. प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. नोकरीत कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्या साठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.

मीनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात आर्थिक प्रश्न सुटतील. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. उत्तम साथ मिळणार आहे. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. 

WhatsApp channel