मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी घर खरेदीचे योग! 'या' ५ राशींसाठी लकी सोमवार

Lucky Zodiac Signs : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी घर खरेदीचे योग! 'या' ५ राशींसाठी लकी सोमवार

Jul 01, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 1 July 2024 : आज नवमी तिथी असून, या दिवशी चंद्र-मंगळ योगासह सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशीचे लोकं ठरतील लकी.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १ जुलै २०२४

आज १ जुलै २०२४ सोमवार रोजी, चंद्र मंगळच्या मेष राशीत भ्रमण करणार आहे आणि शुभ ग्रह गुरू चंद्रापासून पुढील भावात स्थित आहे, ज्यामुळे सुवर्ण लाभाचा योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दहावी तिथी असून या दिवशी सुकर्म योग, धृतिमान योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने महिन्याचा पहिला सोमवारचा दिवस लकी राहील.

मेषः 

आज नोकरी व्यापारात अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रमोशनही मिळू शकते. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. 

वृषभः 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. 

कर्कः 

आज आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. 

सिंहः 

आज प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. खरेदीचे योग येतील. 

तूळ:

आज घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. कामाचा दर्जा सुधारून टाकाल. उत्तमोत्तम खरेदी कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. 

WhatsApp channel