आज १ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, चंद्राने सिंह राशीत प्रवेश केला आहे. या दिवशी शनि-शुक्र समसप्तक योग, सौभाग्य योग, आयुष्मान योग, लक्ष्मी नारायण योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
आज लाभदायी ग्रहयोग आहेत. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. गृहस्थी सौख्य लाभेल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. तुमच्यासमोर शत्रूचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. रोजगारात मात्र प्रतिस्पर्धी डोईजड होतील. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. अत्यंत लाभदायक दिवस असेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत नववर्षाचा पहिला दिवस फायदेशीर आहे. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाह इच्छूकांना जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आंनदी वातावरण राहील. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. परदेशभ्रमणाचे योग आहेत.
आज चंद्र गोचर लाभ स्थानातून होत असुन, विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली होईल. चांगले काम करून घेण्यावर भर राहील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नव्या संधीचा फायदा होईल. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. मित्रांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासातुन आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील.
आजचं चंद्रभ्रमण शुभ असल्याने नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. उधारी वसूल होईल. आपल्या कार्य क्षेत्रात आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. नवीन वस्तु खरेदीकडे मन झुकेल. आपल्या कार्य पद्धतीत बदल फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षे प्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. विदेश भ्रमणाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील.
आज आर्थिक स्थिती संतोषजनक राहिल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. अध्यात्मिक उन्नती साधाल. तुमची वृत्ती आनंदी राहील. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. रोजगारात सहकार्य करणारे नवे मित्र समोर येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात यश मिळणार आहे.