Today lucky zodiac signs : फेब्रुवारीचा पहिलाच दिवस ५ राशींसाठी सवलतीचा, गुंतवणूक फायदेशीर ठरेल
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : फेब्रुवारीचा पहिलाच दिवस ५ राशींसाठी सवलतीचा, गुंतवणूक फायदेशीर ठरेल

Today lucky zodiac signs : फेब्रुवारीचा पहिलाच दिवस ५ राशींसाठी सवलतीचा, गुंतवणूक फायदेशीर ठरेल

Feb 01, 2024 01:52 PM IST

Lucky Rashi Today 1 february 2024 : आज १ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात या ५ राशींना नशीबाची साथ लाभेल, जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 1 february 2024
lucky zodiac signs today 1 february 2024

आज गुरुवार १ फेब्रुवारीला चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी रवियोग, त्रिग्रही योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.

वृषभः 

आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम असल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

मिथुनः 

आज लाभदायक दिवस ठरणार आहे. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभेल. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. 

मेष: 

आज बिनधास्त व चैनीचे जीवन जगावे असे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ घ्याल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन व घर खरेदीचे योग आहेत. 

सिंहः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर मान-सन्मानही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. फायदेशीर काळ आहे. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कन्याः 

आज रखडलेली कामे पूर्ण होतील. सवलती मिळतील.  व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव-नविन संधी आपल्याला मिळतील. कलागुणांना वाव मिळेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. फायदा होईल. 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner