आज १ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून हर्ष योग, लक्ष्मी नारायण योग आणि मृगशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होईल.
आज महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकुल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.
आज शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. देश-विदेशात फिरण्याच्या संधी मिळतील. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजनामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. पैसे गुंतवताना तात्पुरते फायदे लक्षात घेऊ नयेत. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल काळ आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रदोष व्रत फलदायी ठरेल.
आज आर्थिक गुंतवणूक कराल. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज आपल्या वाणीचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवासाचे योग आहेत. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील.
संबंधित बातम्या